TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
राज्याचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी शनिवारी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या (Lawrence Bishnoi Gang) गुंडांनी हत्या केली होती. सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांबद्दलची माहिती समोर येत आहे. सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांनी मुंबई उपनगरात असणाऱ्या कुर्ला येथे पटेल चाळीत एक खोली भाड्याने घेतली होती. तिन्ही मारेकरी याच ठिकाणी राहत होते.
शिवकुमार,धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंह (Gurmel Singh) हे तिघेही 2 सप्टेंबरपासून पटेल चाळीत भाड्याने राहायला आले होते. येथील 225 क्रमांकाच्या खोलीत हे तिघे राहत होते. या तिघांनी या खोलीसाठी तब्बल 14 हजार रुपये भाडे मोजले होते. येथील प्रचलित भाड्यापेक्षा ही रक्कम जास्त होती. मात्र, या तिघांनी एका एजंटमार्फत घरमालकाला दुप्पट भाडे दिले होते. हे तिघेही आजुबाजूच्या रहिवाशांसोबत आदराने वागायचे, अशी माहिती येथील एका रहिवाशाने दिली.