ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 15 October 2024
ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 15 October 2024
अवघ्या काही क्षणांत वाजणार विधानसभा निवडणुकांचं बिगुल... साडेतीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद.. एबीपी माझावर निवडणुकीचे प्रत्येक अपडेट्स..
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत होण्याची शक्यता... कार्तिकी एकादशीनंतर होऊ शकतं मतदान..
चित्रा वाघ, बाबूसिंग महाराज, पंकज भुजबळांसह राज्यपालनियुक्त सात आमदारांचा शपथविधी...भाजपच्या तीन, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला ठरल्याची माहिती... शंभरपेक्षा अधिक जागांसह काँग्रेसच मोठा भाऊ ठरणार...ठाकरेंना शंभरपेक्षा जास्त जागा मिळणार की कमी? याची उत्सूकता
विधानसभेच्या धामधुमीत शिवसेनेकडून बच्चू कडूंची मनधरणी करण्याचा प्रयत्न.. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिवसेना नेत्यांशी चर्चा...
राष्ट्रवादीत गेलेल्या हिरामण खोसकरांचं दोन दिवस आधीच, ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबन... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती..