TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 June 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात पावसाची ओढ; कोकणपासून विदर्भापर्यंत उघडीप, तापमानवाढीने उन्हाचे चटके.
रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील पालू गावात झालेल्या मुसळधार पावसाने काजळी नदी प्रवाहीत, शेतीपूरक पावसामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त
वाशिम जिल्ह्यात अनेक काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही भागात हलक्या ,मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला.
मीरा रोडच्या काशी मीरा येथील आणखी एका सोसायटीत कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरुन वादंग, पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण.
बकरी ईदनिमित्त दिल्लीतील जामा मशिदीमध्ये नमाज पठण, मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी.
विधानसभेला २८८ जागा लढवण्याचा ओबीसी नेत्यांच्या बैठकीत ठराव. सगे-सोयऱ्यांचा जीआर काढू नये, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु, तर शिंदे समिती बरखास्त करावी, ओबीसी नेत्यांची मागणी
80 टक्के मराठा कुणब्यामध्ये समावेश, याची उत्तरे बबनराव तायवाडेंनी द्यावी, तर उपोषण मागे घेईल, ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंचं बबनराव तायवाडेंना प्रत्युत्तर.