TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

Continues below advertisement

पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द, ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी, सज्ञान असल्याचा निर्णय पोलीस तपासानंतर ठरवणार

पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवालची पोलीस कोठडीत रवानगी, विशाल अगरवालसह तिघांना २४ मेपर्यंत पोलीस कोठडी 

गजानन कीर्तिकरांच्या भूमिकेनंतर शिवसेनेत नाराजी, कीर्तिकरांवर पक्षांतर्गत कारवाईची शक्यता, शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीकडे तक्रार अर्ज दाखल

मुंबईतील मतदानाच्या दिवशीची उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद निवडणूक आयोग तपासणार, मतदान सुरू असताना आयोगावर आरोप केल्याची आशिष शेलारांची तक्रार.

राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृत मतदान टक्केवारी जाहीर, राज्यात ४८ जागांवर ६१.०५% मतदान, २०१९ च्या तुलनेत फक्त ०.०९ टक्के मतदान कमी 

विराट कोहलीची बंगळुरु आयपीएल स्पर्धेतून बाहेर, एलिमिनेटर मॅचमध्ये राजस्थानकडून  आरसीबी पराभूत, हेटमायर-परागच्या बॅटिंगमुळे राजस्थान दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दाखल.

उजनी धरण पात्रातील तिसऱ्या दिवसाच्या शोधकार्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार, बेपत्ता झालेल्या सहापैकी एकाचाही दुसऱ्या दिवशी शोध लागलेला नाही

राज्यभरात भीषण पाणीटंचाई, अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा, पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, तर नगरमध्ये दूध उत्पादनावरही परिणाम

करवीरचे काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांचं निधन, बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्याने डोक्याला लागला होता मार,  उपचारादरम्यान वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram