TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 06 June 2024 : ABP Majha

Continues below advertisement

आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा, रायगडावर विविध कार्यक्रमाचं आयोजन, छत्रपती संभाजी महाराज आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडणार.

रायगडावर अखिल भारतीय शिवराज्यभिषेक सोहळा समितीकडून महत्वपूर्ण तयारी,  गडावर 5 लाखांहून अधिक शिवभक्त दाखल होणार असल्याची माहिती.  

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर  राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आज मुंबईत तातडीची बैठक, बैठकीसाठी पक्षाच्या सर्व आमदारांना पाचारण.

महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत  देवेंद्र फडणवीसांचं उपमुख्यमंत्री पद सोडण्याचं सूतोवाच. केंद्रीय नेतृवाला पदातून मोकळं करण्याची विनंती करणार, देवेंद्र फडणवीसांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य. 

संविधान बदलणार असा जो प्रचार केला गेला त्याचा महाराष्ट्रात फटका बसला, महाराष्ट्रात अपेक्षीत यश मिळालं नाही, पत्रकार परिषदेतून फडणवीसांचं वक्तव्य. 

भाजप नेत्यांकडून फडणवीसांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु, मात्र जबाबदारीतून मुक्त करा या भूमिकेवर फडणवीस ठाम असल्याची माहिती. 

निवडणुकीसाठी सगळ्यांनी मिळून काम केलं,त्यामुळे यश अपयश ही सगळ्यांची जबाबदारी, अजित पवार, फडणवीस आणि मी एकत्र काम करणार आहोत, एका पराभवाने आम्ही खचून जाणारे नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फडणवीस यांच्याशी फोनवरुन चर्चा,  फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भात फोनवरून बातचित केल्याची माहिती. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत भाजप नेत्यांची चर्चा, संपूर्ण विचार करुन निर्णय घेतो, फडणवीसांचा भाजप नेत्यांना आश्वासन, पदावरुन मुक्त होण्याबाबत फडणवीस ठाम.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram