TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 07 June 2024 : ABP Majha

Continues below advertisement

लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी भाजपकडून एनडीएच्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी आमंत्रण, तर एनडीएच्या सर्व खासदारांची बैठकही होणार.

एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदींची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड होणार, बैठकीत अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफल्ल पटेल उपस्थित राहणार.

शिवसेनेचे सर्व खासदारही दिल्लीत एनडीएच्या बैठकीसाठी दाखल, एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या एनडीएच्या बैठकीला राहणार उपस्थित.

एनडीएच्या बैठकीनंतर आज भाजप खासदारांची भ़ाजप मुख्यालयात बैठक, लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आढावा घेण्यासाठी बैठक, नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू देखील आपले खासदार घेऊन दिल्लीत येणार.

८ किंवा ९ जूनला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याची शक्यता, सोहळ्यासाठी भूतानचे राजा, श्रीलंकेच्या राष्ट्रपतींसह अनेक प्रमुख नेत्यांना आमंत्रण पाठवल्य़ाची माहिती.

राष्ट्रपती भवनाच्या फोर्ट कोर्ट मध्ये मोदींच्या शपथविधी समारंभाची तयारी सुरु. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, आकाशवाणी महासंचालक कांचन प्रसाद आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी केली तयारीची पाहणी.

महायुतीतील घटक पक्षाची आज मुंबईत बैठक, लोकसभा निवडणुकीतील निकालावर विचारविनिमय करण्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित.

पाच जूनपासून आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक सुरु, तीन दिवसीय बैठकीनंतर आज आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास रेपो रेटबाबत महत्वाची घोषणा करण्याची शक्यता.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram