TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 17 ऑगस्ट 2024 : ABP Majha
नाशिक शहरात कालच्या दंगलीनंतर आज तणावपूर्व शांतता, पालकमंत्री दादा भुसेंनी आज बोलावली तातडीची बैठक, दोन्ही बाजूच्या गटांवर गुन्हे दाखल
रामगिरी महाराजांचं मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य, संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये पडसाद, २ ठिकाणी गुन्हे दाखल होऊनही रामगिरी वक्तव्यावर ठाम
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांचा मुख्यमंत्री शिंदेंकडून संत असा उल्लेख, गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटलांचाही रामगिरींना साष्टांग दंडवत
पुण्यात 'माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभाचा आज राज्यस्तरीय शुभारंभ, एका क्लिकवर जमा होणार एक कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये
लाडकी बहीण योजनेचा आज पुण्याच्या बालेवाडीत भव्य सोहळा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गावरची अवजड वाहनांची वाहतूक २४ तासांसाठी बंद
मी उत्पन्नाची कागदपत्रे घेऊन येते, तुम्हीही आणा... अंजली दमानिया यांचं अजित पवारांना थेट आव्हान'
भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार आज ठरणार, राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आज विस्तारित बैठक, अमित शहा, जेपी नड्डांसह सर्व राष्ट्रीय पदाधिकारी राहणार उपस्थित
महाराष्ट्रात दिवाळीनंतर विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता...गणेशोत्सव, दिवाळी आणि पितृपक्ष असल्याने अजून तारीख जाहीर नाही, निवडणूक आयोगाची माहिती...
कोलकात्यातल्या महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनचा २४ तास देशव्यापी संप, तर विविध संघटनांचा जंतरमंतरवर मोर्चा