TOP 70 News | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट | 20 जुलै 2024 | Maharashtra

Continues below advertisement

TOP 70 News | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट | 20 जुलै 2024 | Maharashtra


राज्यात विकेंडला पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामाव विभागाचा अंदाज, कोकणासह मुंबई उपनगरात काल रात्रीपासूनच पावसाच्या जोरदार सरी.
मुंबईत पहाटेपासून सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग, आज मुंबई, पुणे, पालघर, कोल्हापूर यलो अलर्ट. 
वर्धा येथील पाच तालुक्यात ((सकाळपासून)) अतिवृष्टी,  हिंगणघाट तालुक्यातील तीन मार्ग वाहतुकीसाठी बंद. वीज पडून बैल जखमी, गोठाही जळाला. वर्धा, वणा, बोर, पोथरा, यशोदा, धाम नदीसह लाल नाल्याच्या पाणीपातळीत वाढ.
वर्धाच्या सुरगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे नदीला पूर, सेलू-येळाकेळी मार्गावर असलेल्या पुलावरून पाणी गेल्यानं काही काळ रस्ता बंद, शेत आणि घरांमध्ये शिरलं पाणी
वर्ध्याच्या सेलूमध्ये अतिवृष्टी, तब्बल ४ तास झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं, संसारोपयोगी साहित्याचं नुकासन. 
अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात मुसळधार पाऊस, माधात गावातून वाहणाऱ्या नाल्याला पूर, पुराचं पाणी गावात शिरलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram