TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 16 June 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 16 June 2024 : ABP Majha
मुंबई, ठाण्यात पाऊस पाच दिवस सुट्टीवर, 21 जूननंतरच पावसाचा जोर वाढणार, त्यामुळं आता तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता.
हिंगोलीच्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जिल्ह्यातील ओढ्यांना पूर, जिंतूर- औंढा नागनाथ वाहतूक ठप्प.
एक तासाच्या पावसामुळे परभणीच्या जिंतुरमध्ये पाणीच पाणी, अनेक ओढ्यांना पुर, २० ते २५ गावांचा संपर्क तुटला.
परभणीच्या जिंतुर तालुक्यात मुसळधार पाऊस, बामणी-जिंतुर रस्ता काही काळ बंद, जीव धोक्यात टाकत दुचाकीस्वारांचा प्रवास.
वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील गिंभा, मोहरी परिसरात मुसळधार पाऊस, शेतातील सुपीक माती वाहून गेल्यानं शेतात पेरणी कशी करावी शेतकऱ्यांसमोर प्रश्न.
नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील कहाटूळ शिवारात मुसळधार पाऊस, पावसामुळे पपई, केळी पिकांचं नुकसान.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची पहिल्याच पावसात दुरवस्था, वसईच्या ससुनवघर परिसरात रस्त्याची चाळण, अर्धवट कामामुळे वाहनचालक हैराण.