Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7 AM : 30 Jan 2025 : ABP Majha
Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7 AM : 30 Jan 2025 : ABP Majha
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर लगेच देणार, धनंजय मुंडेचा दिल्लीत पुनरुच्चार, ५० दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरु असल्याची व्यक्त केली खंत, तर देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्याचीही केली मागणी.
धनंजय मुंडे पालकमंत्री असताना कोट्यवधींची बोगस बिलं उचलली, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर मोठा आरोप, तर मुंडेंनी स्वतःचं पालकमंत्रिपदही भाड्यानं दिलं होतं, धसांचं वक्तव्य.
अजितदादांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ नये, लक्ष्मण हाकेंची मागणी, अंजली दमानियांकडून केवळ फक्त संसनाटी करण्याचा प्रयत्न, त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात सादर करावे, हाकेंचं मत.
अजित पवार माझा उल्लेख एकेरी करू शकतात, कधी काळी ते माझेही नेते, अजितदादांकडून सुरेश धसांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्यानंतर धसांची प्रतिक्रिया.
मनोज जरांगे आज दुपारी उपोषण सोडणार, सरपंच हत्या प्रकरणावरुन लक्ष हटू नये म्हणून उपोषण मागे घेण्याचा निर्णय, इथून पुढे उपोषणाची लढाई बंद राहणार, जरांगेंची प्रतिक्रिया.