TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 25 सप्टेंबर 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअक्षय शिंदेच्या वडिलांची मुंबई हायकोर्टात धाव, बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी अक्षयची हत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप, आज तातडीची सुनावणी.
अति रक्तस्त्रावामुळे अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याचा शवविच्छेदन अहवालात उलगडा, अक्षयच्या डोक्याला गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद.
अक्षय शिंदेचा मृतदेह नातेवाईक आज सकाळी अकरा वाजता कळवा रुग्णालयातून ताब्यात घेणार. बदलापूरमध्ये होणार अंत्यसंस्कार. अक्षय शिंदेच्या घरच्यांनी दिली माहिती.
जागावाटपाबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या उपस्थितीत बैठक, सुमारे अडीच तास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर नेत्यांची शाहांसोबत चर्चा.
मराठा आंदोलन आणि कृषी मालाच्या दराचा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर सोडा, तुम्ही फक्त १० टक्के मतदान वाढवा, अमित शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र.
मराठवाड्यातील ३० जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, हा विश्वास मनाशी बाळगा, भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात अमित शाह यांचं वक्तव्य.
ताकदीने मैदनात उतरल्यास कुणीही आपलं वाकडं करु शकणार नाही, पुढे आपलाच विजय आहे, त्यामुळं ताकदीनं मैदानात उतरा, फडणवीसांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना.