TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

महात्मा गांधींची आज जयंती, यानिमित्त राजघाटावर जात राहुल गांधींनी घेतलं गांधीजींच्या स्मृतीस्थळाचं दर्शन तर विजयघाटावर लालबहादुर शास्त्रींनाही राहुल गांधींकडून नमन. 
गांधी जयंतीनिमित्त आज इंडिया आघाडीची मुंबईत पदयात्रा, राज्यातील महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी पदयात्रा, इंडिया आघाडीचे मान्यवर नेते आणि सिव्हिल सोसायटींचे प्रतिनिधी पदयात्रेत सहभाही होणार.
नागपूरमध्ये आज भाजपची महत्वाची बैठक,नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित.  
यंदा महायुतीचे सरकार येईल, ही काळ्या दगडावरची रेघ, अमित शाहांनी संवाद मेळाव्यात व्यक्त केला विश्वास. मात्र २०२९ मध्ये एकट्या भाजपाच्या जीवावर सरकार करायचं असल्याचंही केलं विधान.
सगळ्यांना आपला पक्ष वाढवायचा आहे. मात्र महाराष्ट्राची राजकीय, भौगोलिक परिस्थिती वेगळी,  एका पक्षाचं महाराष्ट्रामध्ये सरकार येऊ शकत नाही. 
इतर पक्षातील कार्यकर्ते फोडून आणा, ज्यांना पक्षातून बाहेर जायचं आहे त्यांनी बिनधास्त जा, अमित शाहांचं भाजपच्या संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांना आवाहन. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram