TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12 June 2024 : ABP Majha
राज्याच्या अनेक भागात पावसाचा अंदाज, कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट, विदर्भ मराठवाड्यात यलो अलर्ट, उद्या आणि परवाही पावसाचा इशारा
पाऊस सुरू झाल्याने पेरण्याची लगबग, वेळेत मान्सून आल्याने शेतकरी वर्गात लगबग
मालेगाव तालुक्यात अजंग-वडेल परिसरात विजेच्या कडकडाटसह ढगफुटी सदृश पाऊस, तब्बल दोन तास पावसानं झो़डपलं...
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतरही भंडारा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई... तर शिर्डीमध्ये अनेक गावांना अद्याप टँकरनं पाणीपुरवठा
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीवरून आघाडी युती धर्माची कसोटी, आज अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस, चारही जागांवरून महायुती, मविआच्या घटकपक्षांची आपापसातच रस्सीखेच
कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षकचे उमेदवार मागे घ्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची उद्धव ठाकरेंकडे मागणी... आमचे प्रवक्ते उत्तर देतील, आदित्य ठाकरेंचं उत्तर...