TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 22 July 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत आज हवामान खात्याकडून यलो अलर्ट जाहीर, काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
पालघर जिल्ह्याला आजपासून तीन दिवस यलो अलर्ट, गेले चार दिवस जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून सूर्या आणि वैतरणा नद्यांना पूर. धामणी धरण ५३ टक्के भरले.
वर्धा जिल्ह्यात आज पुन्हा पावसाचा यलो अलर्ट, नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन.
आज भंडारा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून जिल्ह्याला रेड अलर्ट, सर्व शासकीय आणि खासगी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर.
रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांचे आदेश.
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा सुरु ठेवा, नादुरुस्त किंवा धोकादायक इमारतींमध्ये शाळा भरु नये, कोल्हापूर जिल्हा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या सूचना.
नागपूरमध्ये पावसाचा जोर कायम, नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.
गेल्या ३ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे गडचिरोलीतील अनेक गावांचा संपर्क तुटला, खबरदारी म्हणून आज सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर.