TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :13 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :13 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

 राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना मंगळवारी रात्री मुंबईत जोरदार राडा झाला. जोगेश्वरीत शिंदे गट (Shinde Camp) आणि ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Camp) कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर (Ravindra Vaikar) यांचे कार्यकर्ते महिलांना वस्तूंचे वाटप करत असल्याचे वृत्त मतदारसंघात पसरले होते. यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते मातोश्री क्लब (Matoshree Club) येथे जाब विचारायला गेले होते. यावेळी दोन्ही बाजूचे शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने राडा झाला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमाव मातोश्री क्लबबाहेर जमला होता. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरु होती. यावेळी वायकरांच्या कार्यकर्त्यांनी गेटच्या आतून दगडफेक केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. त्यामुळे मातोश्री क्लबच्या बाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

हा सगळा गोंधळ सुरु असताना याठिकाणी ठाकरे गटाचे जोगेश्वरी पूर्वचे उमेदवार बाळा नर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. तेदेखील शिवसैनिकांबरोबर राड्यात आघाडीवर दिसले. मातोश्री क्लब इथे गेल्यानंतर  वायकरांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणे आहे. पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली.

या सगळ्या राड्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब याठिकाणी आले होते. त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. मुंबईत सगळीकडे हेच सुरु आहे. अनेक ठिकाणी पैसेवाटप, धान्यवाटप सुरु आहे. गेले अनेक दिवस मातोश्री क्लबवर पैसे वाटले जात आहेत. आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला कळवले आहे. मातोश्री क्लबवर गुंडआहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी आम्ही इथे आलो आहोत, असे अनिल परब यांनी म्हटले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram