Top 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा सातच्या 70 बातम्या सुपरफास्ट ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात पावसाची ओढ; कोकणपासून विदर्भापर्यंत उघडीप, तापमानवाढीने उन्हाचे चटके.
वाशिम जिल्ह्यात अनेक काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही भागात हलक्या ,मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला.
तळकोकणात पावसाचा जोर वाढला. सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी.पावसामुळे काही ठिकाणी ओढे पाण्याखाली.
परभणी शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, पेरणीलायक पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावला.
देशभरात आज बकरी ईद सण साजरा केला जातोय, ईदगाह आणि मशिदींमध्ये नमाज पठणासाठी गर्दी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून ईदनिमित्त शुभेच्छा,तर मशिदींबाहेर कडेकोट सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त.
बकरी ईदनिमित्त दिल्लीतील जामा मशिदीमध्ये नमाज पठण, मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी.
मुंबईतही बकरी ईदीचा उत्साह, अनेक ठिकाणी मशिदीबाहेर मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी, नमाज आदा करत मुस्लिम बांधवांकडून एकमेकांना शुभेच्छा.