TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 05 सप्टेंबर 2024 : ABP Majha
मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला कल्याणमधील घरातून अटक, कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमने आपटेला घेतलं ताब्यात, जयदीप आपटे १० दिवसांपासून होता फरार.
मालवण राजकोट पुतळा दुर्घटना चौकशीसाठी नेमलेल्या संयुक्त तांत्रिक समितीचा पाहणी दौरा. समितीनं तब्बल सव्वा तास केली राजकोट किल्ल्यावर पाहणी. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त.
सांगलीच्या कडेगावात आज काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण, शरद पवारांसह अनेक नेते हजर राहणार. उद्धव ठाकरे मात्र गैरहजर असणार.
सांगलीच्या कडेगावात राहुल गांधीच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यासाठी 'हायटेक' मंडप, कार्यक्रमस्थळी जय्यत तयारी, आमदार विश्वजीत कदम यांनी घेतला आढावा.
मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून महाराष्ट्रातील विधानसभानिहाय घोंगडी बैठका घेणार, आज बीडच्या गेवराईत पहिली घोंगडी बैठक पार पडणार.
जालन्यातील अंतरवाली सराटीत मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, 100 गाड्यांचा ताफा घेऊन अब्दुल सत्तार अंतरवलीत दाखल
मंत्री अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगेंमध्ये तीन तास चर्चा, मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फडणवीसांसोबत जरांगेंची फोनवरून चर्चा, मंत्रिमंडळ बैठकीत जरांगेंच्या मागणीवर चर्चा करणार, अब्दुल सत्तार यांची माहिती.
राज्य सरकारचा मोठा निर्णय, एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात साडे सहा हजाराची वाढ. एक एप्रिल २०२० पासूनची थकबाकी मिळणार. ((एसटी संघटनांसोबत मुख्यमंत्र्यांची सकारात्मक बैठक. ))कर्मचाऱ्यांनी संप घेतला मागे.