TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : :16 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : :16 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान...कमला हॅरिस विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अटीतटीची लढत...

कोल्हापुुरात काँग्रेसवर दोनदा उमेदवार बदलण्याची नामुष्की...कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजेंचा अर्ज मागे..
. 
अपक्ष राजेश लाटकरांना काँग्रेस पाठिंबा देणार असल्याची नाना पटोलेंची कोल्हापुरातल्या नामुष्कीनंतर सतेज पाटलांना अश्रू अनावर

...दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं, आपणही ताकद दाखवली असती...सतेज पाटलांचा संताप...

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे आज कोल्हापुरातून फोडणार प्रचाराचा नारळ, अंबाबाईचं दर्शन घेऊन प्रचार सुरू करण्याचा शिरस्ता कायम

अंबाबाईच्या दर्शनानंतर उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर रत्नागिरी जिल्ह्यात सभांचा धडाका, अदमापूरात के पी पाटलांचा प्रचार, रत्नागिरीतही धडाडणार ठाकरी तोफ

सातारा कोल्हापुरात मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रचारसभा, कोरेगाव, पाटण, पट्टणकोडोली, शिरोळ, कोल्हापुरात धडाडणार तोफ

राज ठाकरे आज यवतमाळ दौऱ्यावर, राळेगावात अशोक मेश्रामांसाठी तर वणीमध्ये राजू उंबरकरांसाठी राज ठाकरेंची सभा

राज ठाकरेंची भाजप वगळता उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह अजित पवारांवर जोरदार टीका... शिवसेना, धनुष्यबाण फक्त बाळासाहेबांचाच तर राष्ट्रवादी आणि घड्याळ हे शरद पवारांचं अपत्य, राज ठाकरे कडाडले

शरद पवार आज बारामती मतदारसंघ पिंजून काढणार, अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात ४ सभा, वकील, व्यापारी, डॉक्टरांच्या मेळाव्यातही होणार सहभागी

संजय राऊतांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांच्यावर विक्रोळीत गुन्हा दाखल, शिवसेना उमेदवार सुवर्णा करंजे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कारवाई

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola