TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 31 ऑगस्ट 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 31 ऑगस्ट 2024 : ABP Majha
छत्रपती शिवराय आमचे आराध्य दैवत, शिवरायांच्या पायावर नतमस्तक होऊन माफी मागतो, शिवराय, शिवभक्तांची पंतप्रधानांनी मागितली माफी
शिवरायांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पेशवाईने पुन्हा शिवरायांचा अपमान केला, माफी मागितल्याने प्रश्न सुटणार नाही,  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका. 
निर्भीडपणे माफी मागायला पंतप्रधानांनी कच खाल्ली. पृथ्वीराज चव्हाण यांची मोदींवर टीका. पंतप्रधानांनी जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी. पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उशिरा माफी मागितली, माफीने काही होणार नाही, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा पंतप्रधान मोदींना टोला.
केवळ माफीवीर होऊन चालणार नाही, तर दोषींवर कारवाई करावी लागेल, मोदींच्या माफीवर रोहित पवारांची एक्स पोस्टद्वारे प्रतिक्रिया. 
शिवरायांच्या पुतळ्याच्या घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी माफी मागणे हा त्यांचा मोठेपणा, मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram