Top 60 Superfast News : दिवसभरातील 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 3 जून 2024

Continues below advertisement

Top 60 Superfast News : दिवसभरातील 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 3 जून 2024 

पाचव्या टप्प्याच्या मतदानावेळी पत्रकार परिषद घेतल्यानं उद्धव ठाकरे अडचणीत, आशिष शेलारांच्या तक्रारीनंतर कारवाई करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश
शेवटच्या टप्प्यातल्या मतदानावेळी मोदी ध्यानस्थ बसले हेसुद्धा आचारसंहितेचं उल्लंघन, संजय राऊतांची केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका
लोकसभेच्या महानिकालाला आता अवघे काही तास बाकी, नरेंद्र मोदी हॅटट्रिक करणार की इंडिया आघाडीची जादू चालणार? काहीच तासात फैसला
देशात उद्या सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात, सकाळी ६ पासून एबीपी माझावर अचूक आणि वेगवान निकाल
पराभूत उमेदवारांना ईव्हीएम मशीनमधील मायक्रोचीप तपासण्याचे अधिकार, निवडणूक आयोगाच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना
राज्यात महाविकास आघाडी ३० ते ३२ जागा जिंकणार, जयंत पाटील यांना विश्वास, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ७ पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचाही दावा
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३५ हून अधिक जागा मिळतील, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा, देशातल्या हुकूमशाहीचा अस्त होणार असल्याचंही वक्तव्य

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram