Top 50 News : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 18 ऑगस्ट 2024 : ABP Majha
Top 50 News : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 18 ऑगस्ट 2024 : ABP Majha
जुन्नरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीतील स्थानिक पातळीवरील वाद चव्हाट्यावर, पर्यटन विषयी बैठकीला भाजपला डावलल्याने अजित पवारांच्या ताफ्याला भाजपच्या नेत्यांनी दाखवले काळे झेंडे.
अजित पवारांना काळे झेंडे दाखवणाऱ्या आशा बुचके रुग्णालयात दाखल, आंदोलनानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळी भोवळ आल्याने बुचके रुग्णालयात, काँग्रेस नेते सत्यशील शेरकरांनी घेतली बुचकेंची भेट.
जुन्नरमध्ये अजित पवारांना काळे झेंडे दाखवणारे भाजप कार्यकर्ते ताब्यात, आशा बुचकेंसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम,काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा, अजित पवारांना दाखवलेल्या काळ्या झेंड्यांवर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया, फडणवींकडे खुलासा करण्याचीही केली मागणी.
अजित पवारांना काळे झेंडे दाखवणे ही निव्वळ स्टंटबाजी, काळे झेंडे दाखवण्या ऐवजी दादांना भेटल्या असत्या तर प्रश्न मार्गी लागला असता, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांची टीका.
भाजपने अजित पवारांना काळे झेंडे दाखवले, हे महायुतीसाठी दुर्दैवी, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपत फुलवडे यांची प्रतिक्रिया.