TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट Top 50 News ABP Majha

Continues below advertisement

राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार शरद पवारांचं घर असलेल्या मोदीबागेत, नणंद नीता पाटलांना भेटायला गेल्याची राष्ट्रवादीचे प्रवक्त सूरज चव्हाण यांची माहिती

३३ कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चीट, गैरव्यवहार झाला नसल्याचा चौकशी समितीचा अहवाल

पूजा खेडकर प्रकरणाच्या तपासाला वेग,  नॉन क्रिमिलेयर दाखल्याची वैधता तपासण्यासाठी अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी मागवले कुटुंबीयांचे इन्कम टॅक्स रिपोर्ट

घाटकोपर होर्डिंग प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जबाबदारीची टोलवाटोलवी, आजी-माजी रेल्वे पोलीस आयुक्त आमने-सामने

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावरील पुलाला भगदाड, १५ दिवसांपासून मुंबईला येणाऱ्या २ मार्गिका बंद, महामार्ग प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष

मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीवर उतारा, अवजड महामार्गांसाठी वेळमर्यादा, तातडीने खड्डे बुजवण्याचेही दादा भुसेंचे निर्देश

आता देवालाच आदेश द्यायचा का?, सांगली, कोल्हापूर पूरस्थितीवरुन हायकोर्टाचे सरकारला खडे बोल, सरकारच्या सुस्त प्रशासकीय यंत्रणावर नाराजी

छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरट्यांनी गॅस कटरने एसबीआयचं एटीएम फोडलं, आग लागल्याने १३ लाखांच्या नोटा जळून खाक

जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांचा जवानांवर हल्ला, कॅप्टनसह पाच जवान शहीद, काश्मीर टायगर्सने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

सर्व संतांच्या पालख्या विठ्ठलाच्या भेटीसाठी वाखरीतून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार, संत मुक्ताई आणि संत नामदेव महाराज करणार पारंपरिक स्वागत

एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस, तीन उमेदवार रिंगणात, संजय नाईक आणि
अजिंक्य नाईक यांच्यात मुख्य लढत

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram