Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 01 ऑगस्ट 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेना ठाकरे गट मशाल चिन्हावरच विधानसभा निवडणूक लढणार, मशाल चिन्हाशी साधर्म्य असलेली चिन्हं वगळण्याची आयोगाला विनंती, मशाल चिन्ह घराघरात पोहोचवण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून 'महिला वोट बँकेवर विशेष लक्ष, लाडकी बहीण योजना प्रचार प्रसाराठी उद्यापासून जिल्हा आणि तालुका पातळीवर मेळावे.
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचं मिशन ताई माई अक्का, शिवसेना शिंदे गटाच्या मिशनवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली.
सुजय विखेंची संगमनेर आणि राहुरीतून विधानसभा लढण्याची तयारी, राहुरीतून लढल्यास प्राजक्त तनपुरे विरूद्ध सुजय विखे सामना रंगणार, तर संगमनेरमधून लढल्यास बाळासाहेब थोरात विरूद्ध सुजय विखे सामना रंगणार .
अनितीमान, असंस्कारी, कपाटी, कारस्थानी चेहरा म्हणजे फडणवीस, खासदार संजय राऊतांची टीका.
फडणवीसांनी लफंग्यांची टोळी सोबत घेऊन राज्याची अवस्था बिकट केली, संजय राऊतांची टीका, उद्धव ठाकरेंच्या कालच्या स्फोटक भाषणानंतर आता फडणवीसांनी शिवसेनेच्या नादी लागावंच, राऊतांचं आव्हान.
विधानसभेला मुंबईसाठी भाजपचे विशेष प्लॅनिंग, सहप्रभारी अश्विनी वैष्णव मुंबईच्या ३६ विधनसभा मतदासंघांसाठी बैठका घेऊन रणनीती ठरवणार
राहुल शेवाळे मानहानी खटल्यातला दंड भरण्याचे ठाकरे, राऊतांना आदेश, १० दिवसांत २००० रूपयांचा दंड जमा करण्याचे निर्देश, मानहानीच्या खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी ठोठावलाय दंड.