Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 15 जून 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 15 जून 2024 : ABP Majha
वक्फ बोर्डाला निधी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर विश्व हिंदू परिषदेनं सवाल उपस्थित केला होता, यावर राज्य सरकारचं स्पष्टीकरण, वक्फच्या बळकटीसाठी २०११पासून अनुदान, राज्य सरकारनं केलं स्पष्ट. 
जनतेची दिशाभूल करण्याचा सरकारचा प्रयत्न.  वक्फ बोर्डाला दिलेल्या निधीबाबत काँग्रेसनेते नसीम खान यांची प्रतिक्रिया, तर १० वर्षांत किती निधी दिला , नसीम खान यांचा सवाल. 
मुख्यमंत्र्यांनी  दाढी वाढवणं चांगलं पण दाढीवाल्यांना मदत करणं  योग्य नाही, प्रकाश महाजनांची टीका. वक्फ बोर्ड रद्द करण्याची मनसेची मागणी.
सांगलीत काँग्रेस नेत्यांची एकीची मूठ काहींना बघवली नाही, खडे टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेनं जागा दाखवली, सांगलीत खासदार विशाल पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात आमदार विश्वजित कदमांचं वक्तव्य. 
विश्वजीत कदमांची सांगलीच्या जागेची मागणी योग्य होती, मात्र मविआ जागावाटपात ही जागा शिवसेनेला सुटली, त्यामुळं विश्वजीत कदमांनी आणखी वादात न पडता विधानसभेच्या तयारीला लागावं, विजय वडेट्टीवार यांचा कदमांना सल्ला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram