Top 50 : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 17 July 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTop 50 | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 17 July 2024
राष्ट्रवादीचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांच्या मुलाकडून अपघात, मद्यपान करुन गाडी चालवत टेम्पोला दिली धडक, अपघातात टेम्पो चालक आणि क्लिनर जखमी, गुन्हा दाखल.
मुंबई मेट्रोविषयी केलेली एक्स पोस्ट विनोद तावडेंकडून डिलीट, २४ जुलैपासून भूमिगत मेट्रोसेवा सुरु होणार अशी पोस्ट तावडेंनी केली होती.
नवी मुंबई विमानतळावर विमान सिग्नल यंत्रणेची चाचणी, दोन विमानांच्या माध्यमातून नवी मुंबईत सिग्नल टेस्टिंग, रन वेचं काम युद्धपातळीवर सुरू.
जुलै महिन्याच्या अखेरीस भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जेपी नड्डा, अमित शाह बैठकीत सहभागी होणार, लोकसभा निवडणूक निकालासह सरकारमधील समन्वयावरही चर्चा .