TOP 50 : महत्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 12 June 2024 : ABP Majha

Continues below advertisement

डोंबिवलीत पुन्हा एकदा एमआयडीसीतील एका कंपनीत मोठी आग. आग लागलेल्या कंपनीचं नाव इंडो-अमाईन्स असल्याची माहिती. ( 

डोंबिवलीतील आग लागलेल्या कंपनीत पेस्टीसाईड्स बनवले जातात. आग लागल्यानं परिसरात धुराचे मोठमोठे लोट.  

डोंबिवलीत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दुर्घटनास्थळी, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु. 

आग लागलेल्या स्थानापासून जवळच असलेल्या अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घरी पाठवण्यात आलं. विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून शाळा प्रशासनाचा निर्णय. 

रहिवासी संकुलालगत असलेल्या कारखान्यात भीषण आग, परिसरातल्या कारखान्यांतून कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न,  एमआयडीसी निवासी विभागात  प्रचंड घबराट. 

महाराष्ट्राला केंद्राकडून केवळ ८ हजार कोटी, यूपीला २५ हजार कोटी, बिहारला १४ हजार कोटींचा निधी, निर्मला सीतारमण यांनी पदभार स्वीकारल्यावर जाहीर केला विकास निधी. 

राज्यसभेच्या जागेसाठी आज उमेदवारी  जाहीर होण्याची शक्यता, सुनेत्रा पवार, पार्थ पवार,  छगन भुजबळांचं नाव चर्चेत. 

शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा, वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार, आदित्य ठाकरेंसह प्रमुख नेते उपस्थिती लावणार.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram