ABP News

Top 50 News | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा , सुपरफास्ट बातम्या | 4 Nov 2024 | ABP Majha

Continues below advertisement

Top 50 News | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा , सुपरफास्ट  बातम्या | 4 Nov 2024 | ABP Majha

निवडणूक लढायची तर लढा, नाहीतर माघार घ्या, असं राज ठाकरेंनी सांगितलं, आता विषय संपला, निवडणूक लढवणारच, सदा सरवणकरांचं वक्तव्य. 

शिवसेनेच्या सदा सरवणकरांचा अर्ज कायम, माहीममध्ये मनसेचे अमित ठाकरे, महाविकास आघाडीकडून महेश सावंत तर महायुतीकडून सदा सरवणकर अशी तिरंगी लढत होणार. 

कोल्हापुरात महाविकास आघाडीला मोठा धक्का, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठा ट्विस्ट, अधिकृत उमेदवार मधुरिमा राजेंनी अर्ज घेतला मागे.

बीडमधून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची निवडणुकीतून माघार, क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला होता दाखल, एकाच कुटुंबातील तीन क्षीरसागर एकमेकांसमोर उभे राहिल्याने काय होणार याकडे सर्वांचा होतं लक्ष.

शिवसेनेचे दिंडोरीचे उमेदवार धनराज महाले यांनी घेतली माघार. काल संध्याकाळपासून धनराज महाले आहेत नॉट रीचेबल. महाले यांनी माघार घेतल्यानं राष्ट्रवादीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांचा मार्ग मोकळा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram