Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 5PM : 31 जुलै 2024: ABP Majha

Continues below advertisement

सत्तेत आल्यावर MMRDA बंद करणार, उद्धव ठाकरेंचं मुंबईकरांना आश्वासन, बीएमसीप्रमाणं ठाणे मनपालाही 
भिकेला लावतील, ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला.

'राजकारणात फडणवीस आहेत तोवर मराठी
माणसाला सुख नाही', सुख शांतता हवी असेल
तर यांना सत्तेतून बाहेर काढावं लागेल, खासदार संजय राऊतांची फडणवीसांवर टीका.

भाजपचे प्रभारी, सहप्रभारी आणि राष्ट्रीय संघटन मंत्री लवकरच करणार महाराष्ट्राचा दौरा. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौरा असल्याची माहिती. 

राष्ट्रवादी पक्ष चांदा ते बांदा यात्रा काढणार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची यात्रा, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात अजित पवारांच्या उपस्थितीत चंद्रपूरमधून यात्रा सुरु होणार. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआची समन्वय समिती, काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात. शरद पवारांकडून जयंत पाटील, अनिल देशमुख. आणि ठाकरे गटाकडून संजय राऊत, सुभाष देसाई किंवा अनिल परबांचा समावेश.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram