TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 03 PM टॉप 50 न्यूज : 22 May 2024 : ABP Majha

TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 22 May 2024 : ABP Majha 

पुणे कार अपघातातील अगरवाल कुटुंबीयांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड, विशाल अगरवालचे वडील सुरेंद्रकुमार अगरवालचे छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती
पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीवर वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत नव्याने गुन्हा, कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष, तर याआधी आरोपीला जामीनावर सोडल्यानं सर्व स्तरातून संताप
रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अगरवालला कोर्टात हजर करणार, आतापर्यंत एकूण 7 जणांना बेड्या
पुणे अपघात प्रकरणात राहुल गांधींची एन्ट्री, न्यायही पैशाने विकत घेतला जातोय असा हिंदुस्तान मोदी बनवतायत, राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या इगतपुरीतील भावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू, धरणावर फिरायला गेलेले पाच जण बुडाले, मृतांमध्ये मामा-भाच्यांचा समावेश
मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी नऊ दिवसांनी एसआयटीची स्थापना, गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांच्याकडून आदेश जारी तर दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola