Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 5 PM : 4 ऑक्टोबर 2024: ABP Majha

Continues below advertisement

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 5 PM : 4 ऑक्टोबर  2024: ABP Majha 

माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि. 4) शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेतलाय. गेल्या काही आठवड्यांपासून हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु होत्या. आज अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालाय. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. "हर्षवर्धन पाटील यांचं आमच्या पक्षांमध्ये स्वागत करतो. राष्ट्रवादी प्रवेशाचे अशा पध्दतीचे  असे अनेक धक्के येत्या काही काळात दिसून येतील. राष्ट्रवादीची विचारधारा ते मांडत असतील ते केव्हाही पक्षात येऊ शकतात, त्याचे स्वागत होईल", असं मतंही शरद पवारांनी व्यक्त केलं. 

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या शरद पवारांच्या पक्षात जाण्याच्या निर्णयावर त्यांचे विरोधक आणि अजित पवारांचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "हर्षवर्धन पाटील यांनी जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. कारण हर्षवर्धन पाटील हे मोठे नेते आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी हा निर्णय का घेतला हे त्यांनाच माहिती आहे. अद्यापपर्यंत महायुतीचे जागावाटप झालेले नाही. मला तिकीट मिळणार आहे का नाही? हे मला देखील माहित नाही.
त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी असा निर्णय का घेतला हे त्यांनाच विचारावा लागेल असं दत्तात्रय भरणे म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram