Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 1 ऑक्टोबर 2024: ABP Majha

Continues below advertisement

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024: ABP Majha

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना एक खळबळजनक माहिती समोर  आली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकमेकांचे कट्टर वैरी झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरु असून या दोघांची एक गुप्त भेट झाल्याचे सांगितले जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

सिद्धार्थ मोकळे यांच्या दाव्यानुसार भाजप आणि ठाकरे गटात सध्या गुप्तपणे बोलणी सुरु असल्याचे संकेत मिळत आहेत. मोकळे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले की, वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 25 जुलै रोजी दिल्लीतील 7 डी मोतीलाल मार्ग याठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर दहा दिवसांनी म्हणजे 5 ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी गेले होते. यावेळी ते एकटेच होते, ते स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले होते. मातोश्रीवर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात दोन तास बैठक झाली, असा दावा सिद्धार्थ मोकळे केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram