Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 12 PM : 21 ऑक्टोबर 2024: ABP Majha
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 12 PM : 21 ऑक्टोबर 2024: ABP Majha
विधानसभा निवडणुकींचे (Vidhansabha election 2024) बिगुल वाजल्यापासून काँग्रेस आणि ठाकरे गटातील जागा वाटपाचा संघर्ष समोर येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच राज्यातील काँग्रेसचे (Congress) प्रमुख नेते आता दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. तर ठाकरे गटही आपल्या मतावर ठाम आहे. दरम्यान, मविआतील जागा वाटपाच्या मुद्द्यावर दोघेही पक्ष अडून बसल्याचं चित्र सध्या दिसत असून यांच्यातला वाद आता हायकमांडच्या दरबारात मांडला जाणार आहे. अशातच राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडसोमर आपले म्हणणे मांडत शिवसेना ठाकरे गटासमोर झुकणार नसल्याचा पवित्रा घेताला आहे. वरकरणी जरी मविआत काहीही अलबेल नसले तरी 17 जागांवरुन मविआमध्ये (Maha Vikas Aghadi) जुंपली असल्याची माहिती पुढे आली आहे. यावर बोलताना काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आपली प्रतिक्रिया देत उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्या जागांचा तिढा सुटलेला असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. जागावाटपाची चर्चा संपल्यात जमा आहे. केवळ 15-16 जागांची चर्चा होणे बाकी आहे. तर राज्यातील 7-8 जागा आमच्यात बदलायचे ठरलं आहे. परिणामी, उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्या जागांचा तिढा सुटलेला असेल आणि उद्या संध्याकाळी आम्ही जागा जाहीर करून पुढे गेलेले असू, असा विश्वास विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.