Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 12 PM : 19 ऑक्टोबर 2024: ABP Majha

Continues below advertisement

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12 PM :  19 ऑक्टोबर  2024: ABP Majha 

राज्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) यांच्यातील जागावाटपाच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. लवकरात लवकर जागावाटप पूर्ण करून सर्वच पक्ष पूर्ण ताकदीने प्रचार करणार आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार महायुतीतील जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. मोजक्याच जागांचा प्रश्न असून तो लवकरच मार्गी लावला जाणार आहे. तर महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरील वाद अद्याप मिटलेला नाही. असे असतानाच विदर्भातील दोन जागांवर शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष अडून बसलेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत नागपुरातील (Nagpur) दोन मतदारसंघ जागावाटपाच्या मतभेदाच केंद्रबिंदू ठरत आहेत.   नागपुरात नेमका वाद काय? मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीमधील जागावाटपात दक्षिण नागपूर आणि रामटेक विधानसभा मतदारसंघ या दोन जागांवरून चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. नागपूर शहरातील सहापैकी एक आणि ग्रामीण भागातील सहापैकी एक अशा दोन जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला हव्या आहेत. रामटेक या मतदारसंघातून शिवसेना पक्ष निवडणूक लढलेला आहे. त्यामुळे यावेळीदेखील या जागेवरून आम्हीच निवडणूक लढवणार असा दावा ठाकरे यांच्या पक्षाने केली आहे.   दोन्ही जागांवर काँग्रेसचाही दावा तसेच नागपूर शहरातील दक्षिण नागपूर ही जागाही काँग्रेसने आमच्यासाठी सोडावी अशी आग्रही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. तर दुसरीकडे दक्षिण नागपूर आणि रामटेक या दोन्ही जागा आतापर्यंत काँग्रेसच लढत आलेली आहे. त्यामुळे या जागेवरून आम्हीच निवडणूक लडवणार, अशी भूमिका येथील काँग्रेसने घेतली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram