Top 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 10 Dec 2024

Continues below advertisement

भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, धमकी देणाऱ्या मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीची प्रसाद लाड यांना शिवीगाळ, याप्रकरणी गुन्हा दाखल. 

बीडच्या केज शहरात कळंब रोडवर बस पेटवली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपीला अटक करावी  या मागणीसाठी आंदोलक संतप्त. रास्ता रोकोही केला.

रायगडच्या पेण-खोपोली महामार्गावर विचित्र अपघात, चारचाकीची दुचाकीला धडक, अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी, घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद.

पुण्यात एका नवजात बालकाला रस्त्यावर सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर, वडगाव बुद्रुकच्या रेणुका नगर परिसरातील घटना, रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून बाळाच्या तोंडावर बांधली होती पिशवी. 

सोलापुरात नाल्यामध्ये मृतावस्थेत आढळलं अर्भक, अर्भक कुत्र्याने लचके तोडलेल्या अवस्थेत होतं, प्रत्यक्षदर्शींचा दावा, सोलापुरच्या रूपा भवानी चौकातील घटना.

महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यात कांदा पिकाचा विमा उतरवण्यात मोठा घोटाळा, शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केलेली नसताना, तसेच कमी लागवड केलेली असतानाही जास्तीचा विमा उतरवल्याचा प्रकार समोर.

उत्तराखंडच्या केदारनाथ आणि बद्रीनाथ धाममध्ये सोमवारी हंगामातील पहिला हिमवर्षाव झाला. यानंतर राज्य सरकारने दोन्ही ठिकाणी सुरू असलेली विकासकामे थांबवली आहेत. केदारनाथमध्ये दोन फूट बर्फाची चादर.

फिलिपाइन्समध्ये कॅनलोन ज्वालामुखीचा झाला उद्रेक. शहरातील सुमारे 87 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी केलं स्थलांतरित. ज्वालामुखीच्या स्फोटामुळे राखेचे ढग अवकाशात हजारो किलोमीटवर पसरलेले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram