Top 25 : टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 12 May 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८च्या सुमाराला देशाला संबोधित करणार, ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रसंधीबद्दल काय बोलणार याकडे लक्ष
पाकिस्तानचा हल्ला होणार हे माहीत असल्यानं आम्ही आधीच तयारी केली होती, तिन्ही सैन्यदलांच्या पत्रकार परिषदेत माहिती...भारताच्या अभेद्य एअर डिफेन्स सिस्टिमला टक्कर देणं पाकसाठी अशक्य असल्याचं केलं स्पष्ट...
शस्त्रसंधीवर भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये चर्चा, शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकला जाब विचारला जाण्याची शक्यता, डीजीएमओंमधल्या ऑनलाईन बैठकीपूर्वी मोदींच्या निवासस्थानी खलबतं
उत्तर भारतातल्या ३२ विमानतळांवरून पुन्हा हवाई वाहतूक सुरू, भारत पाकिस्तान तणावानंतर बंद केले होते विमानतळ, श्रीनगर विमानतळ मात्र अजूनही बंदच
भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान वठणीवर, काल रात्री पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार नाही, हवाई हल्लेही थांबले, भारतीय सैन्याची अधिकृत माहिती
लष्करी कारवाई तूर्तास थांबली असली तरी सिंधू पाणीवाटप करार अजूनही स्थगितच, पाकिस्तानशी राजनैतिक संबंधाबाबतही आक्रमक पवित्रा कायम,
उद्या दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होणार. अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार.
शिवरायांचे गडकिल्ले आणि तिर्थ क्षेत्रांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि ठाणे स्थानकावरून ही रेल्वे ९ जूनला सुटणार.
कोकण आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता, ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज.
सोन्याच्या दरात दोन दिवसांत २ हजार रूपयांची घसरण, सोन्याचे दर जीएसटीसह ९७ हजार ५४० रुपयांवर, भारत-पाकिस्तान युद्धस्थिती दरम्यान सोन्याचे दर पोहोचले होते एक लाखाच्या पुढे.
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर शस्त्रक्रिया पूर्ण, गेल्या 4 दिवसांपासून झिरवाळांवर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरु, पोटात इन्फेक्शन झाल्यानं झिरवळ ८ दिवसांपासून रुग्णालयात दाखल.
राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनंतर पवार काका-पुतणे एकत्र, सहकार क्षेत्राच्या मंचावर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये मनमोकळा संवाद, दोघांच्या संवादाकडे सर्वांचं लक्ष.
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर, राज्य सहकारी बँकेने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला लावली होती उपस्थिती.
शरद पवार आणि नितीन गडकरींची वाय बी चव्हाण सेंटरमध्ये भेट. दोघांमध्ये अनौपचारिक चर्चा झाल्याची माहिती.
जुलैमध्ये म्हाडाच्या ४ हजार घरांसाठी लॉटरी, यातील सर्वाधिक घरे ठाणे आणि कल्याणमध्ये असणार, सूत्रांची माहिती, तर ठाण्यातील चितळसरमध्ये १ हजार १७३ घरांचाही समावेश
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अनधिकृत झोपडपट्टीधारकांची हायकोर्टात धाव, झोपडीधारकांना त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी वैयक्तिक सुनावणी देण्याचे राज्य सरकारला आदेश
बीकेसीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ९ किमी लांबीचा असलेला सायकल ट्रॅक काढून टाकण्याचा MMRDAचा निर्णय, सायकल ट्रॅक आदित्य ठाकरेंचा होता ड्रीम प्रोजेक्ट.
मच्छीमारांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवा. पालघरमधील मच्छीमारांची मागणी. त्यामुळे मासेमारीला अधिक चालना मिळेल, मच्छीमारांकडून विश्वास व्यक्त.
ठाण्याच्या सिद्धेश्वर तलावात प्रदूषणामुळे पुन्हा एकदा माशांचा मृत्यू, १५ दिवसातील दुसरी घटना, त्यामुळे जलपर्णीसह प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर.