ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3 PM 11 May 2025

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3 PM 11 May 2025

ऑपरेशन सिंदूर थांबलं नाही, चालूच आहे, वायुदलानं केलं स्पष्ट, ऑपरेशन सिंदूर कशाप्रकारे चालू राहिल ते लवकरच कळवू अशी माहिती...

भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठक, दोन तास चाललेल्या बैठकीत तिन्ही दलाचे प्रमुख, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्र्यांची उपस्थिती

भारताच्या लष्करी काररवाईमुळे पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात धडकी भरली, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य 
((भारतामुळे पाक लष्कराला धडकी-राजनाथ सिंह))

काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काम करेन, शस्त्रसंधीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य, अमेरिकेमुळे शस्त्रसंधीचा ऐतिहासिक निर्णय झाल्याचा अभिमान वाटतो, ट्रम्प यांची एक्स पोस्ट..

संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र,पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिकेकडून शस्त्रसंधीची घोषणा यावर चर्चा करायचीच असा पत्रात उल्लेख..

भाजपनेच पंतप्रधानांचा राजीनामा मागावा, संजय राऊतांची मागणी, शस्त्रसंधीची घोषणा करणारे ट्रम्प कोण असा सवाल..देशाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola