Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 11 डिसेंबर 2024

Continues below advertisement

परभणीत संविधान शिल्पाच्या विटंबनेविरोधातल्या बंदला हिंसक वळण...अनेक ठिकाणी जाळपोळ, आणि दगडफेक...जिल्हाधिकारी कार्यालयातही तोडफोड...

माथेफिरूला अटक, कायदा हातात घेऊ नका,  सर्वपक्षीय नेत्यांची भूमिका...शांतता राखा, सामाजिक सलोखा बिघडू देऊ एबीपी माझाचंही आवाहन...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत...गडकरींची भेट घेतल्यानंतर राजनाथ सिंहांच्या भेटीसाठी रवाना...अजितदादाही दिल्लीत पोहोचणार...

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतपदावरून मविआत वेगवेगळा सूर...ठाकरेंची शिवसेना आग्रही...तर मुख्यमंत्र्यांनी पद देऊ केल्यास निर्णय घेऊ, काँग्रेसची भूमिका....

राहुल गांधींनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांना दिलं गुलाबाचं फूल, एनडीए खासदारांना गुलाब आणि तिरंगा देत संसद परिसरात काँग्रेस खासदारांची गांधीगिरी

क्लच समजून चुकून एक्सिलरेटर दाबल्याने बेस्ट बसचा अपघात झाल्याचं तपासात उघड, संजयला मोठी बस चालवण्याचा अनुभव नसल्याचंही उघड 

राहुरीच्या बहुचर्चित वकील दाम्पत्य हत्याकांडातील माफीच्या साक्षीदाराचा कोर्टात कबुलीजबाब, आज जिल्हा  न्यायालयात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम घेणार उलट तपासणी 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram