Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 21 Sept 2024 : 6 Pm

Continues below advertisement

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 21 Sept 2024 : 6 Pm
राज्यात १० ऑक्टोबरनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता, हरियाणा, जम्मू काश्मीरच्या निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा होणार, निवडणूक आयोगाकडून तयारी सुरु. 
पुढील दोन दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत  राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती, जागावाटपाचा तिढा लवकरच सुटणार, तटकरेंचं वक्तव्य.
शरद पवारांचा 23 आणि 24 तारखेला कोकण दौरा, चिपळूणमधील सावरकर मैदानात पवारांची जाहीर सभा होणार, पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवारांची कोकणात सभा.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी, देवेंद्र फडणवीसांवरच्या धमाकेदार गाण्यानं भाजपच्या प्रचाराची सुरुवात, राम सेवक, शिवभक्त म्हणून फडणवीसांचा गाण्यात उल्लेख. 
मुंबईत २१८ ठिकाणांवर नवीन मतदान केंद्र, मुंबईतल्या मतदानकेंद्रांची संख्या आता १० हजार १११ वर, एका मतदानकेंद्राशी सरासरी १५०० ऐवजी  १२००च मतदार जोडणार 
पुण्यातल्या खड्ड्यांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूसुद्धा नाराज, २ आणि ३ सप्टेंबरच्या दौऱ्यात मोठा त्रास झाला असं पुणे पोलिसांना खरमरीत पत्र. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram