Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : Mahayuti : MVA : Vidhansabha Election : 18 जून 2024

Continues below advertisement

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : Mahayuti : MVA : Vidhansabha Election : 18 जून 2024

विधान परिषदेसाठीच्या ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा. १२ जुलैला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी. 

नाना पटोले यांच्या कृत्याची राहुल गांधी यांनी दखल घ्यावी आणि त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून काढावं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे सचिन खरात यांची मागणी.

उज्वल निकम हे भाजपचे उमेदवार असतानाही त्यांना सरकारी वकील केलंय, मात्र याला काँग्रेसचा विरोध, नाना पटोलेंची प्रतिक्रिया.

महायुतीनं विधानसभा निवडणुकीत रिपाईंला दहा जागा द्याव्यात, केंद्रीय मंत्री रामदासआठवलेंची मागणी. आठवलेंच्या दाव्यानं महायुतीचा जागा वाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता.

वर्षा गायकवाड यांचा काँग्रेस आमदारकीचा राजीनामा, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून विजयी झाल्यानं वर्षा गायकवाड यांचा राजीनामा. 

ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी वडीगोद्री येथे जात लक्ष्मण हाके यांची घेतली भेट, हाकेंच्या उपोषणाला खासदार चंद्रकांत खैरेंनी दर्शवला पाठिंबा.

ओबीसी शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार नसल्याची माहिती, ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीचा निर्णय.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram