TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

Continues below advertisement

एन्काऊंटर झालेल्या अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन नाही दफन होणार...अक्षयच्या वकिलांची माहिती...पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी निर्णय...

चार पोलीस एका आरोपीला आवरू शकले नाहीत का? एन्काऊंटरप्रकरणी हायकोर्टाचे सरकारवर कडक ताशेरे...पिस्तुल चालवणं सामान्य माणसासाठी शक्य आहे का, कोर्टाची प्रश्नांची सरबत्ती...

मनोज जरांगे यांचं उपोषण नवव्या दिवशी स्थगित...संध्याकाळी सोडणार उपोषण...ज्यांनी त्रास दिला त्यांना सरळ करण्याचा दिला इशारा...

ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असं ठाकरे, पवारांकडून लिहून घ्या, फडणवीसांचं मनोज जरांगेंना आव्हान, सर्वपक्षीय बैठकीतल्या निर्णयावर पवारांची सही, फडणवीसांचा गौप्यस्फोट

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला मिळालेल्य़ा भूखंडावरून वाद...अजित पवार आणि विखेंचा विरोध असतानाही भूखंड दिल्याची चर्चा...ट्रस्ट मंदिराचं, खासगी नाही...बावनकुळेचं स्पष्टीकरण...

मोक्याचे भूखंड घशात घालण्याचं सरसकट काम सुरू, वडेट्टीवारांची टीका, तर सब भूमी देवाभाऊ की, राऊतांचा टोला, राष्ट्रवादीची सावध भूमिका

मराठा आंदोलन, नाराजीची चिंता नेत्यांवर सोडा, कार्यकर्त्यांनी कामाला लागा, अमित शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र, बैठकीची इनसाईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती

पंतप्रधान मोदींचा उद्या पुणे दौरा, मोदींच्या कार्यक्रमस्थळी चिखलाचं साम्राज्य, आजही मुसळधार पावसाचा इशारा

मधुकर पिचड, वैभव पिचड स्वगृही परतण्याची शक्यता, शरद पवारांची पुन्हा घेतली भेट, तर रासप नेते रत्नाकर गुट्टेंचे जावई राजाभाऊ देखील हाती तुतारी घेणार

कंत्राटी शिक्षक भरतीविरोधात शिक्षक संघटना आक्रमक... २२ शिक्षक संघटनाचं आज सामूहिक रजा आंदोलन.

सोन्याच्या दरात मोठी उसळी, जळगावात सोन्याचा दर ७७ हजारांवर, अमेरिकी फेडच्या व्याजदर कपातीचा परिणाम

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram