Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 OCT 2024 : 04 PM : ABP Majha

Continues below advertisement

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण, रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव संमत.

उद्योग रत्न पुरस्काराचं नाव यापुढे रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार असणार, तर महाराष्ट्र उद्योग भवनाचं रतन टाटा उद्योग भवन नामकरण, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय,  मंत्री उदय सामंत यांची माहिती. 

रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार. वरळीत रतन टाटा यांच्यावर होणार अंत्यसंस्कार.

रतन टाटा यांचं पार्थिव एनसीपीएमध्ये अंत्यदर्शनासाठी,  दुपारी 4 वाजेपर्यंत सामान्यांना पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार, वरळीत टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार. 

रतन टाटांना मुंबई पोलिसांच्या बँडकडून मानवंदना, टाटांच्या निवासस्थानी दिली मानवंदना.

मुंबई पोलिसांकडून रतन टाटांना मानवंदना, पोलीस  पथकाकडून टाटांना श्रद्धांजली.

रतन टाटांसाठी सर्वधर्म प्रार्थना, एनसीपीएमध्ये ज्या ठिकाणी पार्थिव ठेवलंय त्याठिकाणी केली प्रार्थना.  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram