TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 PM : 31 May 2024 : ABP Majha

Continues below advertisement

पुणे :  पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange)  यांना मोठा दिलासा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील वॉरंट रद्द करण्यात आले आहे.  तसेच वॉरंट रद्द करताना कोर्टाने त्यांना 500 रुपयाचा दंड देखील ठोठावला आहे.  एक जमीनदार द्यायला सांगितला आहे. 2013  मध्ये एका फसवणुकीच्या गुन्ह्यात जरांगेंविरोधात वॉरंट जारी झालं होतं. त्यानंतर जरांगे आज कोर्टात हजर झाले. मी न्यायालयाचा आदर करतो, न्याय सर्वांसाठी समान आहे, अशी  प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी कोर्टात जाण्याअगोदर दिली होती. 

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील  हे पुणे न्यायालयामध्ये दुपारी 12 वाजता पोहचले. न्यायालयाने त्यांना 2013 साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावले होते. त्यानंतर ते न्यायालयासमोर न्यायालयात हजर झाले. त्यावेळी  जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,  न्यायालयाच्या समोर सर्व समान आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मी न्यायालयात हजर झालो आहे. याविषयी अधिक बोलणे योग्य होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram