Top 25 : टॉप 25 न्यूज : 7 PM :5 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Top 25 : टॉप 25 न्यूज : 7 PM :5 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

भारत जोडो यात्रा असो किंवा अन्य कोणता कार्यक्रम असो, गेल्या काही काळापासून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची थेट लोकांमध्ये मिसळण्याची वृ्त्ती सातत्याने चर्चेचा विषय ठरत असते. त्यांच्या याच साधेपणाचा प्रत्यय शनिवारी कोल्हापूरमध्ये (Kolhapur) आला. राहुल गांधी हे आज कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी कसबा बावडा येथे जाणार होते. मात्र, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर नियोजित दौऱ्याला बगल देत एका काँग्रेस कार्यकर्त्याच घर गाठले. 

राहुल गांधी हे उचगाव येथील काँग्रेस कार्यकर्ते अजय सनदे यांच्या घरी गेले होते. राहुल गांधी नियोजित कार्यक्रमात बदल करुन अचानक सनदे यांच्या घरी गेले होते. त्यामुळे याठिकाणी राहुल गांधी यांना पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड मोठी गर्दी केली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांना आवरताना पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram