TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 PM : 14 July 2024 : ABP Majha
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 PM : 14 July 2024 : ABP Majha
विशालगडावर स्थानिकांना मारहाण झाल्याचा आरोप, पोलिसांवरही अज्ञातांनी हल्ला केल्याचा आरोप, गृहविभाग प्रकरणाची गंभीर दखल घेणार मुनगंटीवारांची माहिती
कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमण काढावं यासाठी संभाजीराजे छत्रपती आक्रमक, हजारो शिवभक्तांना घेऊन संभाजीराजे विशाळगडाच्या दिशेनं रवाना.
संभाजीराजे छत्रपतींनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन. देवीच्या दर्शनाने मोहिमेला केली सुरुवात.
आज श्रीरामपूर शहर कडकडीत बंद, अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूर वेगळा जिल्हा व्हावा या मागणीसाठी बंद, या बंदला १०० टक्के प्रतिसाद.
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला 19 गावांचा विरोध, हद्दवाडीविरोधात सगळ्या 19 गावांमध्ये आज कडकडीत बंद, सर्व व्यवहार ठप्प राहणार.
आज बारामतीत राष्ट्रवादीचा जनसन्मान महामेळावा, बारामतीतून अजित पवार विधानसभेचं रणशिंग फुंकणार.
अजित पवारांच्या जनसन्मान महामेळाव्याची जय्यत तयारी सुरु, अजित पवार आणि सुनील तटकरेंकडून सभास्थळी पाहणी.