TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 05 PM : 29 May 2024 : ABP Majha
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खासदार संजय राऊतांना मानहानीची नोटीस, तीन दिवसांत माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा नोटिशीत उल्लेख, लोकसभा निवडणुकीत शिंदेंनी पैसे वाटल्याचा राऊतांनी केला होता आरोप.
मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीत जुंपली, राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी तर भाजपकडून अनिल बोरनारे निवडणूक लढवण्यास इच्छूक, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता.
महाडमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मनुस्मृतीचं दहन. मनृस्मृतीचे श्लोक अभ्यासात समाविष्ट करण्यास आव्हाडांचा विरोध.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड येथे, मनुस्मृतीच्या विरोधाचा स्टंट करताना जितेंद्र आव्हाड यांनी, आंबेडकरांचा फोटो फाडला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी. भाजप प्रदेश महामंत्री संजय केनेकेर यांची मागणी.
आंबेडकर प्रेमी म्हणून आव्हाडांनी केलेल्या घटनेचा निषेध, त्यांनी तात्काळ देशाची माफी मागावी, अमोल मिटकरींची मागणी.