TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 05 PM : 21 May 2024: ABP Majha

Continues below advertisement

पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात सरकार अॅक्शन मोडवर, गृहमंत्री फडणवीसांची तातडीने पुणे पोलीस आयुक्तालयात धाव, 

पुण्यात कोझी अँड ब्लॅक पबवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात छापा, पब सील

शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांची खंत उघड, शिंदे गटात गेल्याने कुटुंबात एकटा पडल्याचं वक्तव्य, एबीपी माझाशी एक्स्लुझिव्ह बातचीत

मतदानाच्या गैरसोयीची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल, मुख्य सचिव नितीन करीर यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश

उद्धव ठाकरेंच्या बोटाला हिरवी शाई, कमी मतदानाच्या मुद्द्यावरुन निवडणूक आयोगावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर आशिष शेलारांचा हल्लाबोल

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माझा शंभर टक्के प्रचार केला नाही, मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंची खदखद, तर कार्यकर्ते मनापासून झटले, उन्नीस-बीस होऊ शकतं, उमेश पाटील यांची प्रतिक्रिया

राज्याचा बारावीचा ९३.३७ टक्के निकाल, कोकण विभाग अव्वल तर छत्रपती संभाजीनगरमधील रेणुका बोरमणीकरला १०० टक्के गुण

नागपुरात खोट्या कागदपत्रांद्वारे आरटीई अंतर्गत नामांकित शाळांमध्ये प्रवेश, एका पालकाला बेड्या तर १९ पालकांविरोधात गुन्हा दाखल

मराठवाड्यात जलसाठ्याने तळ गाठला, हिंगोलीत भर उन्हात पाण्यासाठी तारेवरची कसरत, टँकरमधून विहिरीत सोडलेल्या पाण्यासाठी महिलांसह लेकरांची झुंबड

जळगाव जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट, तापमानाचा पारा ४६.३ अंशांवर, उन्हामुळे जळगावकर हैराण

घाटकोपरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी फ्लेमिंगो पक्षांचे मृतदेह, कालही आढळले होते ३९ मृत फ्लेमिंगो, फ्लेमिंगोंच्या मृत्यूचं गौडबंगाल 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram