TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 21 May 2024: ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात बालहक्क मंडळाचा निर्णय धक्कादायक, आदेशाविरोधात वरील कोर्टात दाद मागणार, गृहमंत्री फडणवीसांची घोषणा, पुणे पोलीस आयुक्तालयात फडणवीसांनी घेतली तातडीची बैठक
पुणे अपघात प्रकरणाची सरकारकडून गंभीर दखल, राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांच्या पुणे पोलिसांना सूचना
रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील आरोपी विशाल अगरवालला पुण्यात आणलं, उद्या कोर्टात हजर करणार, विशाल अगरवाल अल्पवयीन आरोपीचे वडील
पुण्यात कोझी पबवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात छापा, पब सील
शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांची खंत उघड, शिंदे गटात गेल्याने कुटुंबात एकटा पडल्याचं वक्तव्य, एबीपी माझाशी एक्स्लुझिव्ह बातचीत
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माझा शंभर टक्के प्रचार केला नाही, मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंची खदखद, तर कार्यकर्ते मनापासून झटले, उन्नीस-बीस होऊ शकतं, उमेश पाटील यांची प्रतिक्रिया
लोकसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळणार नाही, आमदार बच्चू कडू यांचा महायुतीला घरचा आहेर
जळगाव जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट, तापमानाचा पारा ४६.३ अंशांवर, उन्हामुळे जळगावकर हैराण
मराठवाड्यात जलसाठ्याने तळ गाठला, हिंगोलीत भर उन्हात पाण्यासाठी तारेवरची कसरत, टँकरमधून विहिरीत सोडलेल्या पाण्यासाठी महिलांसह लेकरांची झुंबड
घाटकोपरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी फ्लेमिंगो पक्षांचे मृतदेह, कालही आढळले होते ३९ मृत फ्लेमिंगो, फ्लेमिंगोंच्या मृत्यूचं गौडबंगाल
राज्याचा बारावीचा ९३.३७ टक्के निकाल, कोकण विभाग अव्वल तर छत्रपती संभाजीनगरमधील तनिषा बोरमणीकरला १०० टक्के गुण
मतदानाच्या गैरसोयीची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल, मुख्य सचिव नितीन करीर यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश