TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan : ABP Majha

Continues below advertisement

भारतीय जनता पार्टीतर्फे सदस्यता नोंदणी अभियान, या पार्श्वभूमीवर भिवंडीमध्ये तालुका पदाधिकारी आढावा बैठक संपन्न, ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. 

मालेगावनंतर अमरावतीतही रोहिंग्या मुस्लिमांचा घोटाळा, भाजप नेते किरीट सोमय्यांचा दावा, अंजनगाव सुर्जीत ६ महिन्यांत अकराशे जन्मदाखले दिल्याचं तहसिलदारांनी सांगितलं, सोमय्यांची माहिती.

अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तहसील अंतर्गत अकराशे खोटे जन्म दाखले दिल्याचं प्रकरण, दर्यापूर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, जन्माच्या दाखल्यासाठी देण्यात आलेले दस्तावेजाची होणार कसून चौकशी.

बेळगावात जय महाराष्ट्र म्हटल्याने कानडी संघटना आक्रमक, कन्नड संघटनांचा महापालिकेत घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न, काही दिवसांपूर्वी बेळगावमधील कार्यक्रमात सहभागी झालेल्या शिवेंद्रराजे भोसलेंनी जय महाराष्ट्र अशी दिली होती घोषणा.

जिजाऊंच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारीला कोल्हापुरातल्या वारणानगर इथं शिवरायांची जगातील सर्वात मोठी रांगोळी साकारली जाणार, ३५ टन रांगोळीच्या वापरातून ११ एकर जागेवर साकारणार शिवरायांचं चित्र. 

शेगाव तालुक्यामध्ये केस गळती आणि टक्कल पडणाऱ्यांची संख्या १०० वर, आज नव्या ३६ लोकांचा यामध्ये समावेश. 

बुलढाण्यातील केस गळतीच्या प्रकरणातील पाण्याचा अहवाल प्राप्त, पाण्यात नायट्रेटचं प्रमाण जास्त असल्याने बुलढाण्यात केस गळती झाल्याचं समोर.

आयफोनचे बनावट स्पेअर पार्ट विकणाऱ्या दुकानांवर नाशिक पोलिसांचा छापा, ग्राहकांच्या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांची मोठी कारवाई.

राहुल गांधी दिल्लीतील एका आईस्क्रीमच्या दुकानात कोल्ड कॉफी बनवली. राहुल गांधी यांनी एक्स वर व्हीडिओही केला शेअर.

जम्मू-काश्मीरमध्ये थंडीची लाट कायम, घसरलेल्या तापमानामुळे दल सरोवर गोठलं.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram