Top 25 : टॉप 25 न्यूज : 05 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 01 October 2024 : ABP Majha

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत आजही सुप्रीम कोर्टात सुनावणी नाहीच. १५ ऑक्टोबरला होणरा सुनावणी. आज कोर्टाच कामकाज तीन वाजता संपल्याने प्रकरण सुनावणीसाठी आलंच नाही.

महाराष्ट्रातील २८८ पैकी १७६ आमदारांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती, टक्केवारीनुसार ही आकडेवारी 62 टक्के इतकी, यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आमदारांची संख्या ११३, एडीआरनं २०१९ मध्ये निवडणुकीनंतर केलेल्या विश्लेषणातून माहिती समोर. 

पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो सुरु, मेट्रोच्या तिकिटांपेक्षा मेट्रो स्थानकावर पार्किंगची तिकीट जास्त,  मेट्रो प्रशासनावर पुणेकरांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त.  

सरकारने मागण्या मान्य न केल्यास 1 नोव्हेंबर पासून राज्यभरात धान्य पुरवठा बंद करणार. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारक महासंघाचा निर्णय. अमरावतीत स्वस्त धान्य दुकानदारांची संयुक्त शिखर परिषद.

राज्यात नवीन ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी परवानगी, दुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांची प्रवेश यादी जाहीर, विद्यार्थ्यांना ६ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेता येणार. 

गुजरातची अमूल कंपनी महाराष्ट्रात करतेय विस्तार. पुण्यात अमूलचा आईसक्रीम निर्मिती प्रकल्प. प्रकल्प  ३१ ऑक्टोबरपर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता. महाराष्ट्रात अमूलचा विरारलाही आहे एक प्रकल्प. 

नवरात्रीनिमित्त अंथरूण पांघरून विशेष करून गोधडी धुण्यासाठी सगळ्यांचं प्राधान्य. कोल्हापुरातल्या रंकाळा परिसरात नागरिकांची अंथरूण पांघरूण धुण्यासाठी गर्दी. अंथरुण पांघरूण उन्हात वाळत घातल्याने रंकाळा  कलरफुल. याचं ड्रोन दृश्यं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram