TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 17 August 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 17 August 2024 : ABP Majha
मविआकडे १० ते १२ मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने बघणारे नेते, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना नेते शहाजीबापूंचा टोला.
रामगिरी महाराजांची सुरक्षा वाढवली, वादग्रस्त वक्तव्यानंतर रामगिरी महाराजांविरोधात काल राज्यभरात मोर्चे.
घटक चाचणीच्या तोंडावर महापालिकेच्या शाळांमधील २ हजार शिक्षक विधानसभा निवडणुकीच्या कामावर, गुरुवार, शुक्रवार, शनिवार मतदार यादी तयार करण्याचं काम शिक्षकांकडून सुुरु.
म्हाडाच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी मुंबई मंडळातर्फे १९ ऑगस्टला लाईव्ह वेबिनार, म्हाडाच्या २ हजार ३० घरांसाठी ९ ऑस्टपासून अर्ज नोंदणी आणि स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात.
सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाचा डावा कालवा फुटला, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तर गावाचा पाणीपुरवठाही बंद, डाव्या कालव्याच्या कामाची चौकशी करावी, शेतकऱ्यांची मागणी.
बीड जिल्ह्यातील पाटोदा परिसरात मध्यरात्री मुसळधार पाऊस, मांजरा नदीला पूर, खबरदारी म्हणून पाटोदा शहरातील शाळा, कॉलेजांना सुट्टी.